आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकरांचा भारिप-बमसं करणार गवई गटाला अमरावतीत मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - होळीच्या शुभपर्वावर वैचारिक मतभेदांचे दहन करीत अमरावतीत प्रकाश आंबेडकरप्रणित भारिप-बहुजन महासंघ आणि रा. सू. गवईप्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मनोमिलन झाले. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारिप-बमसं आता रिपाइंचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांच्यासोबत राहणार आहे. एका संयुक्त पत्रकार परिषदेत मंगळवारी अमरावती येथे हा निर्णय जाहीर करण्यात आला.
डॉ. राजेंद्र गवई, प्रवीण मनोहर, अनिल बरडे, राजेंद्र जोशी, वसंत ढवळे, रामेश्वर अभ्यंकर, भाऊ ढंगारे यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत भारिप-बमसंने दोन्ही आंबेडकरी पक्षांची भूमिका स्पष्ट केली. लहान बंधूच्या नात्याने आपण भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांनी आशीर्वाद दिले, असे गवई यांनी सांगितले. जी वचने दोन्ही काँग्रेसने दिली होती, ती त्यांनी पाळली नाहीत. महायुतीने रामदास आठवले यांना दिलेले वचन पाळले. त्यामुळे दलित समाज यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार नाही, असे मनोहर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी बघता, आता गवई आणि आंबेडकर या दोन्ही बहुजन समाजाशी संबंधित पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर यांनी सांगितले.