आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहातून पळालेल्या कैद्याचा अजूनही शोध नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या खुल्या कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने शनिवारी कारागृहाच्या शेतातून पोबारा ठोकला. त्या कैद्याच्या शोधासाठी कारागृह प्रशासनासोबतच फ्रेजरपुरा पोलिसांनीही प्रयत्न केलेत; मात्र रविवारी सायंकाळपर्यंत त्या कैद्याचा शोध लागला नव्हता.
मोहन मोतीराम चव्हाण (४५) असे त्या कैद्याचे नाव आहे. मोहनला ३० जुलै १९९७ ला न्यायालयाने जन्ठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे ही शिक्षा भोगण्यासाठी चव्हाणला अकोला येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. १९९७ ते २२ मार्च २०१४ पर्यंत चव्हाण अकोल्याच्या कारागृहातच होता. दरम्यान, अमरावती मध्यवर्ती कारागृहात खुले कारागृह सुरू करण्यात आले. या ठिकाणी खुल्या कारागृहात ५० बंदी ठेवण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे स्थानिक मध्यवर्ती कारागृह विभागातील इतर कारागृहांतील काही निवडक ज्यांची वागणूक अधिक चांगली आहे, अशा कैद्यांची खुल्या कारागृहासाठी निवड झाली. त्या ५० कैद्यांमध्ये मोहन चव्हाणचा समावेश होता. शनिवारी इतर कैद्यांसोबत मोहनसुद्धा कारागृहाच्या परिसरातच असलेल्या कैद्यांसोबत शेतीकामासाठी आला होता. दुपारच्या वेळी त्याने शेतातून पोबारा केल्याचे सांगण्यात आले. वास्तविक, कारागृहाचे रक्षक कैद्यांवर लक्ष देण्यासाठी कार्यरत असतात. असे असतानाही कैद्याने गुंगारा देऊन पळ काढला आहे. अद्याप त्याचा सुगावा लागला नाही. या घटनेने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेचे धिंडवडे मात्र निघाल्याचे दिसत आहे.
पोलिसांचेही प्रयत्न सुरूच
कारागृहातीलकैदी पसार झाल्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी पसार आरोविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. या संदर्भात वाशीम पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. त्याचा शोध घेण्याबाबत वाशीम पोलिसांना पत्रसुद्धा देण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक शिशिर मानकर यांनी सांगितले.