आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी पार्किंग वसुलीवर कुणाचेही नाही नियंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमाघर, मॉल्स येथे वाहन पार्किंग करण्यासाठी वसुली केली जात असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही प्राधिकारिणी अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अशा खासगी व्यावसायिक ठिकाणी ‘पे अँड पार्क’ पद्धतीने वसुली करण्यास मंजुरी देण्याचे अधिकार कुणाला, याबाबत चौकशी केली असता सर्वच विभाग आपापले नियम तपासू लागले आहेत.

शहरातील बहुतांश सिनेमाघर, सुपर मार्केटमध्ये वाहनांचे पार्किंगकरायचे असेल, तर शुल्क आकारले जाते. याबाबत ‘दिव्य मराठीने’ वृत्त प्रकाशित केल्यानंतर अशा पद्धतीने पार्किंगला परवानगी देण्याची जबाबदारी कुणाची आहे, नियमान्वये ती स्वीकार्य आहे काय, असेल तर तो नियम कोणता याबद्दल पोलिस, महसूल, महापालिका या विभागांमध्येच खल सुरू झाला आहे. ‘दिव्य मराठी’ने अशा पार्किंगबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक सु. पुं. कांबळे, पोलिस उपायुक्त बी. के. गावराणे, महसूल विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांना विचारलेल्या काही प्रश्नांमधून याबाबतचे नेमके अधिकार कुणाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोण, काय म्हणाले ?
- खासगी शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमाघरांमध्ये संबंधित व्यावसायिक पैसे वसूल करून पार्किंग करू देऊ शकतो काय? त्याबद्दल काही नियम आहेत का?

- महापालिका : अशा पार्किंगला परवानगी देण्याबाबत काही लिखित नियम असल्याचे ऐकिवात नाही. आम्ही याबाबत कुणालाही परवानगी देत नाही.

- पोलिस : खासगी व्यावसायिक ठिकाणी पे अँड पार्कला परवानगी देण्याचे अधिकार आम्हाला नाही. मात्र, अशा व्यावसायिक इमारतींबाहेर बेशिस्त पार्किंग असेल, तर आम्ही कारवाई करू शकतो.

- महसूल : सिनेमाघर, शॉपिंग कॉम्प्लेक्सला जे लायसन्स दिले जातात, त्यात पे अँड पार्कच्या मंजुरीचा समावेश आहे, असे ऐकिवात नाही; पण याबाबत नेमके काय, ते संपूर्ण नियमावली पाहूनच सांगता येईल.

- जर ही वसुली नियमबाह्य असेल, तर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार कुणाला आहे?

- महापालिका : आम्ही फक्त बांधकाम करताना संबंधिताने पार्किंगची जागा नकाशानुसार सोडलीय की नाही, हे तपासू शकतो. पार्किंगासाठी पैसे वसूल केले जात असतील, तर याबाबत नियम काय ते पाहूनच सांगावे लागेल.

- पोलिस : अशा वसुलीबाबत गुन्हा दाखल करण्याची तरतूद नाही. परंतु कुणाची त्यातून फसवणूक, लुबाडणूक होत असेल तर तो तक्रार देऊ शकतो. तपासाअंती कारवाई होईल.

- महसूल : मुळात अशा प्रकारची परवानगी कोण देतो, हे आधी शोधणे गरजेचे आहे. पार्किंगला मंजुरी देण्याचे अधिकार ज्या प्राधिकारिणीला असतील, त्यालाच कारवाईचे अधिकार असतात, असे कायद्यात अभिप्रेत आहे.

- शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमाघरांमध्ये पैसे घेऊन पार्किंग करायला लावतात आणि त्यानंतरही तेथे पार्किंग आपल्या जोखमीवर करावी, असे फलक वाचायला मिळत असतील, याबद्दल ग्राहकाला तक्रार करायची असल्यास ती आपण स्वीकारणार काय?

- महापालिका : तक्रारी प्राप्त झाल्यास त्या स्वीकारल्या जातील. मात्र, कारवाईबाबत नियमांची पडताळणी केल्यानंतरच पावले उचलली जातील.

- पोलिस : समोर आलेली प्रत्येक तक्रार स्वीकारली जाते. ती दखलपात्र की अदखलपात्र हे ठरवले जाते. तपासानुसार कारवाई केली जाते. याबाबतही तसेच होईल.

- महसूल : लोकांच्या तक्रारी असतील तर त्या निश्चित स्वीकार्य आहेत. लोकशाही दिनातही लोकांना अशा प्रकारच्या सर्व तक्रारी दाखल करण्याची मुभा आहे.