आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल टंचाईने नागपूरकर पोळले, 'व्‍हॅट' वृद्धी विरोधात पंपचालकांचे खरेदी बंद आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरः रणरणत्‍या उन्‍हात होरपळून निघालेले नागपूरकर पेट्रोल टंचाईने पोळून निघाले आहेत. राज्‍य सरकारच्‍या 'व्‍हॅट'मध्‍ये वाढ करण्‍याच्‍या निर्णयाला नागपुरातील पेट्रोल पंप चालकांनी तीव्र विरोध केला असून तीन दिवस पेट्रोल खरेदी न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या खरेदी बंद आंदोलनाचा मोठा फटका सर्वसामान्‍य जनतेला बसत असून कंपनी संचालित पंपावर तोबा गर्दी झाली आहे.
केंद्र सरकारने दरवाढ केल्‍यानंतर राज्‍य सरकारने 'व्‍हॅट'मध्‍ये वाढ केली होती. त्‍यामुळे नागपूरात पेट्रोलच्‍या दरात आणखी
प्रति लिटर 1.67 रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दरही 92 पैसे प्रति लिटर वाढले. पेट्रोल व डिझेलवरील वॅटचे दर वाढविल्याच्या विरोधात पेट्रोल पंपधारकांनी खरेदी बंद आंदोलन सुरु केले. कालपासून हे आंदोलन सुरु झाले. त्‍यानंतर पहिल्‍याच दिवशी शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील पेट्रोल-डिझेल संपले. फक्त कंपनी संचालित पंप सुरु आहेत. त्‍यामुळे या पंपांवर प्रचंड गर्दी झाली आहे. काही पंपांवर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्‍या आहेत. शहरात केवळ 5 पंप कंपन्‍यांचे आहेत. तर 55 पंप खासगी आहेत.
राज्‍य सरकारने
नागपूर, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर आणि नंदूरबार मनपा हद्दींमध्ये पेट्रोल व डिझेलवर दोन टक्के मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट वाढवण्याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे या ठिकाणच्‍या जनतेला आणखी एका दरवाढीने दणका दिला आहे.
पेट्रोल दरवाढीचा दुहेरी दणका, नागपुरकर हैराण (पाहा फोटो)
कच्‍च्‍या तेलाचे बाजारातील वास्‍तवः सरकार दरवाढ घेईल का मागे?
‘व्हॅट’मुळे पेट्रोल-डिझेलचा भडका; पेट्रोल, डिझेल महागले
जुन्या पेट्रोल कार होणार अधिक स्वस्त