आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quarrel In Amravati Municipal Corporation, Corporators Broken Mike

अमरावती महापालिकेच्या आमसभेत ‘राडा’, नगरसेवकांकडून माइकची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या आमसभेत सोमवारी गदारोळ झाला. अपात्र नगरसेवक आणि रिलायन्स प्रकरण या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून माइक व टेबलची फेकफाक केली, तर बसप गटनेत्याच्या वादात अजय गोंडाणे समर्थकांनी आमसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. सभागृहात नगरसेवकांचा संताप तर बाहेर बसप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अपात्र नगरसेवक व रिलायन्स कंपनीला शहरात खोदकामास दिलेली परवानगी याप्रश्नी पीठासीन सभापती आणि प्रशासनाने चुप्पी साधल्याने नगरसेवक चिडले होते. गटनेते प्रकाश बनसोड, अजय गोंडाणे, राजू मसराम यांनी माइकची फेकफाक केली. गोंडाणे यांनी सभागृहातील टेबल लाथ मारून पाडला. तर सभागृहाबाहेर जमलेल्या गोंडाणेंच्या समर्थकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या गोंधळातच उपमहापौर नंदकिशोर व-हाडे यांनी सभा स्थगित केली.
काय आहे वाद?
अपात्र नगरसेवकांशी संबंधित विषय सभेत का नाकारण्यात आले, याचा जाब सदस्यांनी प्रशासनाला विचारला. त्यावर विषयपत्रिकेत प्रश्न समावेश करण्याचा अधिकार महापौरांचा असल्याचे आयुक्त अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले. सभापतीकडून यावर कोणतेही उत्तर येत नसल्याने सदस्य आणखी आक्रमक झाले होते.