आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quarrel In Between Mp Anandrao Adasul And Police Commissioner

खासदार आनंदराव अडसूळ, पोलिस आयुक्तांचे ‘वाजले’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नवरात्रोत्सवात मंडळाला रात्री उशिरापर्यंत लाउडस्पीकर सुरू ठेवण्यास परवानगी देण्याच्या कारणावरून खासदार आनंदराव अडसूळ आणि पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्यात शनिवारी रात्री उशिरा फोनवरच जोरदार खडाजंगी झाली.

शहरात रात्री 12 वाजेपर्यंत गरबा सुरू ठेवण्यास पोलिसांनी मंडळांना मौखिक परवानगी दिल्याचे मंडळांचे म्हणणे होते. मात्र, शनिवारी रात्री 11 च्या सुमारास आयुक्तांनी लाउडस्पीकर बंद करण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे तुषार भारतीय, शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी पोलिस आयुक्तांना या संदर्भात विनंती करण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. या विषयावर चर्चा करत असताना अडसूळ आणि आयुक्तांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. उपस्थितांनी घटनेला दुजोरा दिला असला तरी पोलिस आयुक्तांनी कोणताही वाद झाला नसल्याचे म्हटले आहे.

राजापेठ पोलिसांची दोन मंडळांवर कारवाई
राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील दोन मंडळांनी पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याने संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. जलाराम सत्संग मंडळ व युवा नवदुर्गोत्सव मंडळात रात्री 10 नंतर लाउडस्पीकर वाजवल्यामुळे पोलिसांनी मंडळांवर गुन्हा दाखल केला आहे.