आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती विद्यापीठाच्या ‘पीएचडी’वर प्रश्नचिन्ह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेमून दिलेल्या निकषांना डावलून अभ्यास सुरू असल्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. (आचार्य पदवी) काय कामाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यूजीसीने 2009 मध्ये लागू केलेल्या निर्णयानुसार, नेट/स्लेट/सेट (नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, स्टेट लेक्चरर इलिजिबिलिटी टेस्ट व स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षेविना अधिव्याख्यात्याची नोकरी मिळवण्यासाठी ‘कोर्स वर्क’सह आचार्य पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. मात्र, चार वर्षांनंतरही विद्यापीठ प्रशासनाने ही बाब स्वीकारली नाही. त्यामुळे अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
‘मिनिमम स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर फॉर अवार्डिंग पीएच.डी. डिग्री’ यूजीसीने तयार केलेल्या या मापदंडानुसार कोणत्याही ठिकाणी अधिव्याख्यात्याच्या नोकरीसाठी पीएच.डी.ची पदवी मिळवताना कोर्स वर्क पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्यांनाच नेट, स्लेट, सेट परीक्षेतून त्यांनाच सूट मिळणार आहे. हे कोर्स वर्क किमान एका सेमीस्टरएवढय़ा (सहा महिने) कालावधीचे असणे आवश्यक आहे. ते पूर्ण न करता मिळालेली पीएच.डी.ची पदवी नेट/स्लेट/सेटमधून सूट मिळवण्यासाठी पात्र ठरणार नाही, असा स्पष्ट उल्लेख यूजीसीच्या निर्णयात करण्यात आला आहे.

कोर्स वर्क नसल्यास काय?
कोर्स वर्क पूर्ण न करता पीएच.डी. केल्यास कुणाचे संशोधनकार्य अमान्य होत नाही. मात्र, नोकरी देताना ही पदवी नेट/स्लेट/सेटला पर्याय म्हणूनही ग्राह्य धरली जाणार नाही. यूजीसीच्या मते, कोर्स वर्क हा भाग पीएच.डी. आणि एम. फील.साठीचा पूर्व पदवी अभ्यासक्रम समजला जाईल. यात संख्यात्मक पद्धत व संगणक हाताळणी आदींचा समावेश असावा, असेही स्पष्ट केले आले आहे.