आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळे कसले उभारता? विचार अमलात आणा, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदींना सुनावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आधी सरदार पटेल आणि आता महात्मा गांधींचा जयजयकार सुरू आहे. सरदार पटेलांचा पुतळा गुजरातेत उभारणार असल्याचे मोदींनी सांगितले. महापुरुषांचे पुतळे उभे करण्यापेक्षा त्यांचे विचार अमलात आणले पाहिजेत,’ असा सल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांना दिला. रामटेक येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला. त्यांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाची सुरुवात विदर्भातून केली. काँग्रेसची सुरुवातही इथूनच झाली,’ याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले. ‘गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला अधोगतीकडे नेले, हे मोदींचे म्हणने धादांत खोटे आहे. असे म्हणणे हा देशातील जनतेचा अवमान आहे. एखादी संस्था वा सरकारला विकासासाठी पूर्णपणे जबाबदार धरणे योग्य नाही,’ असे मतही राहुल यांनी व्यक्त केले.