आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी राहुल गांधी विदर्भ दौ-यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - काँग्रेस उपाध्यक्ष आणि प्रचारप्रमुख राहुल गांधी आज महाराष्ट्रातील जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी वर्धात आले आहेत. जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी आलेले राहुल गांधी म्हणाले, केवळ एक व्यक्ती देश चालवू शकत नाही. एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान असली तरी देशाला विकसीत करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते. पक्षांतर्गत लोकशाहीला काँग्रेस मध्ये सर्वाधिक महत्त्व असल्याचे राहुल गांधी वारंवार सांगत आहेत. येथेही त्यांनी कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा पुनर्रुच्चार केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून आणि समजून काँग्रेस जाहीरनामा तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 17 जानेवारी रोजी केली होती. त्यानंतर भोपाळ येथे महिलांच्या मागण्या काय आहेत. त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, याची त्यांनी याआधी माहिती घेतली होती.
विदर्भातील विविध जिल्ह्यातून येथे लोक आले असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. राहुल गांधी सर्वांचे ऐकून घेत असून त्यावर स्वतःची भूमिका मांडणार आहेत. महिलांच्या मागण्या जाणून घे्ण्यात त्यांनी स्वारस्य दाखवले.
इंदिरा आवास योजनेचे अनुदान एक लाखांवरुन दोन लाख करण्याची मागणी, भंडारा येथून आलेल्या एका महिलेने केली. प्रत्येक जिल्ह्यातून एका महिलेला विधानसभेची उमेदवारी देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.