आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी घेणार जिल्हानिहाय आढावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 24 सप्टेंबरला नागपुरात येणार असून, सुराबर्डी येथे राज्यातील 17 जिल्हय़ातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी स्वतंत्रपणे इन कॅमेरा संवाद साधून आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी,22 सप्टेंबरला सायंकाळी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राहुल गांधी यांच्या दौर्‍याचा आगामी निवडणुकीच्या तयारीशी कुठलाही संबंध नसून, पक्षबांधणी हा एकमेव अजेंडा राहणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठारके म्हणाले की, प्रत्येक जिल्हय़ाची स्वतंत्र बैठक होणार आहे. त्या बैठकीत जिल्हाध्यक्षांपासून ब्लॉकस्तरावरील नेत्यांचा समावेश असेल. प्रत्येक जिल्हास्तरावर सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हानिहाय बैठका आटोपताच विदर्भातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामुळे संघटनेतील नेते व लोकप्रतिनिधी अशा एकूण अडीच हजार लोकांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत.