आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा इकोनॉमी क्लासमधून प्रवास; मुले, युवकांशी साधला संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: फ्लाइटमध्ये चिमुरडीला मांडीवर घेतलेले राहुल गांधी)
नागपूर- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बुधवारी (29 एप्रिल) दिल्‍लीहून नागपूरला पोहोचले. यावेळी राहुल गांधी यांनी इकोनॉमी क्लासमधून प्रवास केले. प्रवासादरम्यान राहुल गांधी लहान मुलांसोबत मोबाइलवर गेम खेळताना तर युवकांशी संवाद साधताना दिसले.


राहुल गांधी तब्बल सात वर्षांनी विदर्भाच्या दौर्‍यावर आले आहेत. राहुल गांधी यांचा एकूण दौरा 175 किलोमीटर असेल. राहुल गांधी त्यापैकी 15 किलोमीटर पदयात्रा करणार आहेत. उर्वरित दौरा कारने करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आत्‍महत्‍या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे दु:ख जाणून घेणार आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, इकोनॉमी क्लासमधून प्रवास करणारे राहुल गांधी...