आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटीला येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नैसर्गिक आपत्तीत होरपळणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येणार आहेत. मेच्या पहिला आठवड्यात ते मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमिटीतील सूत्रांनी दिली. गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे शेतकऱ्यांना ते भेटतील.

विदर्भानंतर ते मराठवाड्यात उस्मानाबाद किंवा परभणी जिल्ह्यास भेट देणार असून, त्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी, गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. राहुल यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना मिळाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दौऱ्याचे संकेत देतानाच दौऱ्याचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली.