आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raid On A Pub In Nagpur College Students Found Drunk

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा, विद्यार्थी - विद्यार्थीनी का तोंड लपवत चालले; घरी सांगितले कॉलेजला निघालो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मेट्रोसिटीप्रमाणे आता नागपूरची तरुणाईही पब संस्कृतीच्या जाळ्यात अडकत चालली आहे. फ्रेंडशिप डे च्या एक दिवस आधी वेस्ट हायकोर्ट मार्गावर एका हॉटेलमध्ये लपून छपून सुरु असलेल्या पबवर छाप टाकण्यात आला.
यावेळी पबमध्ये संगीताच्या बेधूंद लहरींवर मद्याचे पेले रिचवत तरुणाई थिरकत होती. पोलिसांनी युवक-युवतींना ताब्यात घेऊन समज देऊन सोडून देण्यात आले. पब व्यवस्थापनाच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी ५० हून अधिक युवक-युवतींमधील अनेकजण हे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे आढळून आले. नागपूरातील उच्चभ्रू वस्तीत राहाणारे हे सर्वजण होते. पोलिसांनी त्यांची नावे विचारल्यानंतर काही वेळ त्यांनी आरडोओरड केली मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर ते शांत झाले.
गुन्हे शाखेचे अधिकारी माधव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. पोलिसांना मांगी हॉटेलमध्ये पब सुरु असल्याची टीप मिळाली होती. तसेच तिथे आमली पदार्थ देखील मिळत असल्याची खबर होती. शनिवारी हॉटेलमध्ये विशेष पार्टीचे आयोजन केले जाते. पोलिसांनी रात्री १२ च्या सुमारास छापा टाकला. हॉटेलच्या तिस-या मजल्यावर पार्टी सुरु होती. कर्णकर्कश्य आवाजत सुरु असलेल्या डीजेवर युवक-युवती नशेत नाचत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारात बाऊंसर तैनात होते.
एक व्यक्ती युवकांना काही पाकिटे वाटत होता. त्याच्याबद्दल पोलिसांनी अजून काहीही सांगितलेले नाही. पोलिसांनी पबमधून डीजेसह इतर साहित्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्यांना गुन्हे शाखेत नेण्यात आले, तिथे उशिरा रात्रीपर्यंत त्यांची चौकशी सुरु होती.
नगरमध्ये हॉटेल महाराजावर छापा
औरंगाबादेतील सिडको भागातील कुंटणखान्यावर छापा
रेव्ह पार्टीवरचा छापा बनावट, युवा काँग्रेसचा आरोप
कुलाब्यात डान्स बारवर छापा; चार जर्मन मुलींना अटक