आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिकाम्या गाडीपुढे काँग्रेसचे ‘रेल रोको’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा रेल्वे स्थानकाच्या एका कोपर्‍यात उभ्या असलेल्या रिकाम्या अमरावती-बडनेरा शटल गाडीपुढे बुधवारी (ता. 25) काँग्रेसने रेल रोको आंदोलन केले.

आमदार रावसाहेब शेखावत, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उपाख्य बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचले. आंदोलनापूर्वी कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेतली. यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या शटलपुढे कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

बडनेरा स्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर शटल गाडी उभी होती. ही रेल्वे पूर्णपणे रिकामी होती. त्या ठिकाणी कार्यकर्ते संतापाच्या मुद्रेत रेल्वे इंजिनवर चढले. काँग्रेस आणि एनएसयुआयचे झेंडे फडकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

भय्यासाहेब मेटकर, श्रीराम नेहर, रावसाहेब लंगोटे, बबलू शेखावत, संजय मापले, वसंत साऊरकर, राजा टवलारकर, प्रदीप देशमुख, भागवत खांडे, सुधाकर दहातोंडे, बापुराव गायकवाड, गजानन मेसरे, गणेश आरेकर, किशोर किटुकले, विनोद चौधरी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

काही मिनिटांमध्येच संपले आंदोलन
अवघ्या काही मिनिटांमध्येच कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हे आंदोलन संपले. सर्वप्रथम फलाट एकवर कार्यकर्ते जमले होते. यानंतर रेल्वे सुरक्षा अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अमरावती-बडनेरा शटलपुढे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्यानंतर हे आंदोलन संपवण्यात आले. या प्रसंगी केंद्र सरकारच्या रेल्वे दरवाढीविरोधात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून, सरकारने केलेली भाववाढ त्वरित मागे घेण्याची मागणी या प्रसंगी कार्यकर्त्यांनी केली.
आंदोलन प्रतिकात्मक
४आम्हाला लोकांना त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे आम्ही प्रतिकात्मक पद्धतीने आंदोलन केले. आम्ही लोकांच्या हितासाठी आंदोलन केले. लोकांना त्रास देण्यासाठी नाही. ही काँग्रेसची परंपरा नाही.
रावसाहेब शेखावत, आमदार

(फोटो - बुधवारी अमरावती-बडनेरा शटल गाडीपुढे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. छाया : शेखर जोशी)