आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात वीज पडून सहा ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विदर्भात सोमवारी सायंकाळी काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. यादरम्यान, वीज पडून अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन, असे सहाजण ठार, तर आठजण जखमी झालेत. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कोळवण बेडा येथे पित्यासह दोन मुलांचा समावेश आहे. त्यांची आई गंभीर जखमी झाली. अमरावती जिल्ह्यातील धामंत्री येथील एक, तर धामणगाव रेल्वे येथील दोघांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यात वीज पडून तिघे गंभीर झाले. मानोरा तालुक्यात कारखेडा येथे ही घटना घडली. वर्धा जिल्ह्यातील बोरखेडी येथील चौघे जखमी झाले.

यवतमाळ : कोळवण बेडा येथील मेंढपाळ वस्तीतील एका पालावर वीज कोसळून साहेबराव महानर (40), त्यांची मुलगी बेबीबाई (17) आणि मुलगा कान्हा (पाच) हे तिघे ठार झाले. साहेबराव महानर यांची पत्नी जुलाबाई (35) गंभीर जखमी झाली.

धामंत्री येथे युवती ठार
अमरावती - तिवसा तालुक्यातील धामंत्री येथील हर्षा रामेश्वर थोटे ही युवती सायंकाळी शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून ती ठार झाली. वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बोरखेडी येथील काहीजण शेतात काम करत होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने दिनेश चंडिवाले (22), बबन तायवाडे (20), दीपक लायकूजी (56) आणि माणिक पराते (50) गंभीर जखमी झाले. या घटनेत दीपक व माणिक या दोघांना अंधत्व आले.