आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात वीज कोसळून सात जण ठार; महागाव, मेहकर येथे मुसळधार पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ/बुलडाणा - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी दुपारपासून यवतमाळ बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भात जोरदार हजेरी लावली. या वेळी ढगांचा प्रचंड गडगडाट होऊन वीज पडून वेगवेगळ्या घटनांत सात जण ठार, तर चौदा जण जखमी झाले. संतोष दातकर (३५), गजानन रामचंद्र जाधव (३६, दोघेही रा, करंजखेड ता. महागाव), तुकाराम पवार (५८ रा. माणकिडोह, ता पुसद), किशोर राठोड (१८ माळसोली, ता. पुसद) तर एका मृताचे नाव अद्याप समजू शकले नाही. बुलडाणा िजल्ह्यातील मेहकर येथे उकळी-सुकळी निंदनासाठी गेलेल्या सुमित्रा शिवाजी औटगे (२०) िहचा वीज पडून मृत्यू झाला.
सुमित्राचा तीन महिन्यांपूर्वीच शिवाजी औटगे यांच्याशी विवाह झाला होता. उकळी येथील शारदा अर्जुन बोरे (५५) यांचाही वीज पडून मृत्यू झाला, तर वेगवेगळ्या घटनांत एकूण चौदा जण जखमी झाले. येत्या चोवीस तासांत आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मुंबईत गेल्या काही दवि सांपासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे अनेक भागांत सखल पाणी साचल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.