आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापूंच्या होळीवर राज ठाकरे यांची टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- राज्यात भीषण पाणीटंचाई असताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी होळीच्या नावाखाली पाण्याची नासाडी करणे योग्य नसल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ठाकरे म्हणाले, यंदा दुष्काळाने राज्यातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई आहे. खेड्यात एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे होळीच्या नावाखाली आसाराम बापूंनी पाण्याची नासाडी करणे योग्य नाही. बापूंच्या भक्तांनी पत्रकारांना केलेली मारहाण निंदनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.


आसाराम बापू यांनी या आठवड्यात नाशिक, नागपूर येथील सत्संगात मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी साजरी केली होती. नवी मुंबईत झालेल्या या उत्सवानंतर मात्र बापूंवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. त्यानंतर बापूंच्या कार्यक्रमांना होळीपर्यंत राज्यात बंदी घालण्यात आली आहे.

स्वबळावर सत्ता आणणार : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसून स्वबळावर सत्ता आणणारच, असे राज यांनी पुन्हा ठणकावून सांगितले.