आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकवा आल्याने राज ठाकरे यांचा भंडारा दौरा रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भाच्या दौ-यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोमवारी थकवा जाणवू लागल्याने त्यांचा नियोजित भंडारा दौरा रद्द करण्यात आला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दौरा ठरवला जाणार असल्याचे
मनसेच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या नागपुरात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. रविवारी दिवसभर झालेल्या धावपळीमुळे राज यांना रात्री थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी सायंकाळी नागपुरातून पायी फेरफटकाही मारला. सध्या ते रविभवनमध्ये विश्रांती घेत आहेत. भंडारा येथील मुरमाडी गावात तीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या झाली होती. या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज ठाकरे सोमवारी मुरमाडीलाही जाणार होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव तूर्त हा दौरा रद्द करण्यात आला. राज ठाकरे यांची 24 मार्च रोजी अमरावतीत जाहीर सभा होणार आहे.