आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Comment On Thakur, Kadam & Other 3 Mla Suspended Issue

विरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का?; राज ठाकरेंचा सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- पोलिस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्यावर विधिमंडळात मारहाण केल्या प्रकरणी पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी फक्त विरोधी पक्षाच्या आमदारांवरच कारवाई का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांवरच कारवाई करणे अयोग्य असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. वाशिममध्ये आमदारांवरील निलंबनावर आपली भूमिका मांडली आहे. अर्थसंकल्पात अडचण नको, म्हणून सरकारने सत्ताधारी आमदारांवर कारवाई केली नसल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण झाली त्यादिवशी, 'माझ्या पक्षातील आमदार असला तरी, त्याच्यावर विधिमंडळातील नियम आणि कायद्यानुसार कारवाई करा', असे राज ठाकरेंनी सांगितले होते.