आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Divya Marathi, Vidarbh

विदर्भातील संभाव्य उमेदवार राज ठाकरे आज निवडणार, नागपूरात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे विदर्भातील उमेदवारांच्या निवडीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. रविवारी िदवसभर ते संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये व्यस्त राहणार आहेत. विदर्भात मनसेचे फारसे काम नसल्याने ितकिटांसाठी िकतपत गर्दी होते, याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा मनसेने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी राज ठाकरे यांचे नागपुरात आगमन झाले. त्यांच्यासोबतच मनसेचे िवधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर हेदेखील आले आहेत. रविवारी रविभवन येथे िवदर्भातील सर्व ११ िजल्ह्यांमधील ६२ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती ते स्वत:च घेणार आहेत. त्यासाठी मनसेच्या इच्छुक नेत्यांना िजल्हानिहाय वेळ देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यास केवळ अर्धा तासाचा वेळ िमळणार आहे. िवदर्भातील बहुतांशी िजल्ह्यांमध्ये मनसेचे नेटवर्क नावालाच आहे. प्रामुख्याने पूर्व िवदर्भात कुठेही मनसेचा प्रभाव नाही. त्यामुळे मनसेचे ितकीट मागण्यासाठी िकतपत गर्दी होते, याकडे नेत्यांचे लक्ष लागलेले आहे. मागील तीन वर्षातील राज ठाकरे यांचा हा ितसरा िवदर्भाचा दौरा आहे.
िवदर्भात मनसेचे नेटवर्क वाढवणि्याचे प्रयत्न झाले असले तरी त्याला अपेिक्षत प्रतिसाद लाभलेला नाही.