नागपूर- ठाकरे कुटुंबीयांची जेनिनटिकल समस्या अशी आहे की आम्ही सुरुवातीपासूनच कुठला एखादा मतदारसंघ
आपला मानला नाही. आजोबांपासून ते बाळासाहेबांपर्यंत हेच चालत आले आहे. कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवली नाही. महाराष्ट्र हाच आम्ही मतदारसंघ मानला. त्यामुळे एखाद्या जागेवरून निवडणूक लढवण्याचा विचार केल्यास दुसऱ्या मतदारसंघाने काय पाप केले? असा भावनिक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे निवडणूक लढवायची तरी कोठून?’ असा प्रश्न उपस्थित करून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे रविवारी स्पष्ट केले.
विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखतींसाठी राज रविवारी नागपुरात होते. रविभवन येथे इच्छुकांनी गर्दी केली होती. त्यानंतर राज यांनी माध्यमांजवळ भूमिका मांडली. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर कायम आहात काय, यावर राज म्हणाले, आपल्या त्या घोषणेमागील भावना वेगळी होती. मात्र, त्यानंतर बराच विचार केला. मुंबईत लढायचा निर्णय घेतला तर विदर्भातून का नाही, असाही स्वाभाविक प्रश्न निर्माण झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मोदींच्या विजयात काँग्रेसचाही वाटा
लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक वेगळी आहे. लोकसभेची निवडणूक अमेरिकी राष्ट्राध्यक्षाप्रमाणे झाली. त्यात लोकांनी मोदींनाच मतदान केले, याकडे लक्ष वेधून राज म्हणाले, मोदींच्या विजयात काँग्रेस आणि राहुल गांधी यांचाही मोठा वाटा होता. आता तशी निवडणूक होणार नाही. विधानसभेची उत्सूकता मीडियालाच जास्त आहे, लोकांना नाही. आयोगाने निवडणुकीच्या तारखा लवकर जाहीर करणे सोयीचे होईल. जास्त सस्पेन्स ठेवण्यात अर्थ नाही, असे राज म्हणाले.
विदर्भाला विरोधच, आई-मुलाची ताटातूट नको
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पूर्ण विरोध असल्याचे सांगून राज यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले.विदर्भाची प्रगती होऊ दिली नाही, त्यांना वेगळे पाडण्याची गरज आहे. हा अतिशय भावनिक प्रश्न असल्याचे सांगून राज म्हणाले, छत्रपती शिवरायांचा जन्म पुण्यातला. तर राजमाता जिजाऊ विदर्भातल्या. त्यामुळे आई-मुलाची ताटातूट का करता? विदर्भाचा राग संपूर्ण महाराष्ट्रावर का काढता? असा सवालही राज यांनी केला.
(मोदींच्या नागपुरातील सभेवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या बहिष्काराबाबत)
चौकशी, त्यांच्याकडेच मागणी
सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीवर राज म्हणाले, ज्यांची चौकशी करायची, त्यांच्याकडेच मागणी करण्यात काय अर्थ? राज्यात टोलच्या समस्येवर अन्य िवरोधकांनी तोंडही उघडले नाही, असा टोलाही राज यांनी लगावला.