आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू, नागपुरात उत्स्फूर्त स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्‍यातील तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून दहा दिवस ते विदर्भातील विविध शहरात जाऊन पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी राज यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत झाले. चंद्रपूर, गडचिरोली, वणी, यवतमाळसह इतर शहरात ते जाणार आहेत.

24 मार्च रोजी अमरावती येथे ठाकरे यांची केवळ एकच सभा होणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आधी या ठिकाणीच सभा घेतली होती. त्यामुळे राज यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष आहे.

विदर्भ दौर्‍यादरम्यान राज ठाकरे भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथील अत्याचार करून खून केलेल्या तीन पीडित मुलींच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.