आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरायचंच तर मारून मरा! मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे विदर्भातील शेतकर्‍यांना आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - ‘गेल्या पासष्ट वर्षांपासून तीच ती माणसे निवडून दिली जात आहेत. वीज, पाणी, रस्ते आणि नोकर्‍यांचे आमिष देऊन सत्ता काबीज केली जाते. देशाची परिस्थिती मात्र जैसे थे आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तनाची गरज आहे,’ असे प्रतिपादन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी केले. ‘तुमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणणार्‍यांना आधी मारा, मगच मरा,’ असा विचित्र सल्लाही त्यांनी विदर्भातील शेतकर्‍यांना दिला.
यवतमाळ मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. ‘यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारचे नियोजन नाही आणि योजनाही नाही. याकडे गंभीरतेने बघायला कोणी तयार नाही. भाकरी का करपली, तर ती उलटलीच नाही,’ असे सांगत राज ठाकरे यांनी सत्तापरिवर्तन करण्याचा सल्ला दिला.
पाणी नाही, दारूचे मात्र पाट : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक आदिवासी तरुणींवर ठेकेदार, जमीनदारांनी मातृत्व लादले आहे. जिल्ह्यात जवळपास 450 कुमारी माता आहेत. हा अत्यंत ज्वलंत प्रश्न असतानाही येथील खासदार भावना गवळी काहीच करायला तयार नाहीत, असे सांगून राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यात फिरताना कालवे कोरडे, तर दारूची दुकाने मात्र जास्त दिसतात. सरकार प्यायला पाणी देत नाही, मात्र दारू जास्त उपलब्ध करून देते हे देशाचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.

परप्रांतीयांवर टीका
आपल्या राज्यात आपल्याच नोकर्‍या -व्यवसाय परप्रांतीयांकडून हिसकावले जात आहेत. नोकरीसाठी 5 ते 6 लाख बेरोजगारांचे अर्ज मनसेने रेल्वे प्रशासनाला पाठवले, मात्र अजून एकही कॉल त्यांनी पाठवला नाही. परप्रांतीय अधिकारीसुद्धा त्याच भागातील लोकांना साहाय्य करून महाराष्ट्रातील रोजगार परप्रांतीयांच्या पदरी पाडत असल्याची टीका राज यांनी केली.