आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackerey Criticizes Forest Minister Patangrao Kadam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघाच्‍या शिका-यांची माहिती देणा-याला राज ठाकरेंकडून दोन लाखांचे बक्षीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर: वनमंत्री पतंगराव कदम यांच्‍यावर हल्‍लाबोल करतानाच महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी वाघाच्या शिकाऱ्याची माहिती देणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर शिकाऱ्याचा खात्‍मा करणा-या अधिका-याला 5 लाख रुपये देण्‍याची घोषणाही राज यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी नुकतीच चंद्रपूर जिल्‍ह्यातील ताडोबा अभयारण्याला भेट देऊन वाघांच्या वाढत्या शिकारीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनंतर त्यांनी आज ही घोषणा केली. चंद्रपूर दौ-यावरुन राज ठाकरे नागपुरात पोहोचले. तिथे त्‍यांनी पत्रकार परिषदेत वनमंत्र्यांवर कडाडून टीका केली. पतंगराव कदम यांना वन खात्‍यात रस नाही. त्‍यामुळे त्‍यांचे वन खात्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. वनमंत्र्यांच्‍या उदासिनतेमुळे अधिकारी सुस्‍तावले, असे राज ठाकरे म्‍हणाले. वाघांच्‍या शिकारीबाबत राज ठाकरे यांनी स्‍थानिकांना दोषी ठरविले आहे. स्‍थानिकांच्‍या मदतीशिवाय घनदाट जंगलात सापळा रचणे अशक्‍य असल्‍याचे राज म्‍हणाले.
वाघांना वाचवण्यासाठी राज ठाकरे ‘ताडोबा’त
उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे; छगन भुजबळांचा उपरोधिक सल्ला