आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यकर्त्यांनाच महाराष्ट्राची किंमत नाही ते कसे विकास घडवणार - राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र संग्रहित )
नागपूर : नागपुरात झालेल्या प्रचारसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याचा विकास कसा करायचा हेच ज्यांना माहिती नाही, त्यांना ते जमणार कसे असे सांगत आपण त्यासाठी आराखडा तयार केला असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
वाचा, काय म्हणाले राज...
राज्यातील सगळ्या शहरांचे वाटोळे झाले आहे. कोणालाही शिस्त नाही. राज्यकर्त्यांनाच शिस्त नसेल तर राज्याला तरी कशी शिस्त राहणार. विकास कसा होतो, राज्ये कशी उभी राहतात हे मी विकास आराखड्यात दाखवून दिले आहे. ते सगळ्यांनी एकदा पाहा. फिरायला मैदाने, बागा, मैदाने, कॉलेज, शाळा असावी. मी आराखड्यात हिरोशिमा नागासाकीची उदाहरणे दिली आहेत. एवढा मोठा हल्ला सहन करून त्यांनी जागतिक दर्जाची अत्यंत आदर्श शहरे विकसित केली. त्याउलट आमची शहरं बॉम्ब टाकल्यासारखी दिसत आहेत.
प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर पाणी, वीज, शिक्षण, रोजगार याची आश्वासने दिली जातात. त्यामुळे आमची हुशार मुले परदेशात जातात. त्याचे कारण त्यांना याठिकाणी सुविधा मिळत नाही. म्हणजे आपण टॅलेंट एक्सपोर्ट करतो. पण ती दुस-यांच्या कंपनीत काम करतात. इथे खेळाडुंनाही सुविधा मिळत नाही. राज्यकर्ते केवळ कारखाने आणण्याचा विचार करतात. पण इतर रोजगार निर्मिती करण्याचा काहीही विचार नसतो.
आपल्याकडे वन, पर्यटन ही अत्यंत दुय्यम खाती समजली जातात. पण जगातील अनेक देश केवळ जंगलांवर त्यांची अर्थव्यवस्था चालवतात. एकट्या गोव्यात सुमारे हजारभर खासगी विमानं येतात. पण नागपुरात एवढी पर्यटनस्थळं असून त्याचा वापर होत नाही. राज्याचे वैभवच कोणाला माहिती नाही. यांनाच जे माहीत नाही ते हे सगळं इतरांना कसे सांगणार.सिंचनाच्या नावावर केवळ भ्रष्टाचार करून सरकारने जनतेची लूट केल्याचेही ते म्हणाले.