आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघा महाराष्ट्र माझा मतदारसंघ सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवडणूक न लढवण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची गर्जना काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती, मात्र निवडणूक लढवणे हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही. अवघा महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे. असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (रविवारी) नागपूरमध्ये होते. या मुलाखतीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ते कुठून निवडणूक लढवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. ते कुठून निवडणूक लढवणार याबाबत प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यावर अजूनही विचार सुरू असल्याचे सूचक उत्तर त्यांनी दिले.
निवडणुकांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करण्यात याव्या अशी मागणी यावेळी त्यांनी केली. येणा-या 10 दिवसांमध्ये मनसेची दुसरी ब्लू प्रिंट जाहीर करणार असून त्यामध्ये विदर्भासाठी विशेष योजना असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. विधानसभेसाठी विदर्भातल्या 40 ते 45 जागा लढवणार आहे. स्वतंत्र विदर्भाला आमचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(फाइल फोटो: मनसे प्रमुख राज ठाकरे)