आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - ‘केंद्रातील यूपीए सरकारवर घोटाळ्यांचे आरोप होत असले, तरी त्यात तथ्य नाही. टू जी आणि कोळसा प्रकरणात रालोआने राबवलेली धोरणे आम्ही कायम ठेवली. त्यात संशय निर्माण झाल्यावर आम्ही कारवाई केल्याने त्याच्या माध्यमांमध्ये हेडलाइन झाल्या. त्यातूनच चुकीचा संदेश गेला’, असा दावा केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी रविवारी केला.
नागपूर र्शमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यूपीए सरकारच्या 10 वर्षांतील कामगिरीला फोकस करूनच आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे सांगताना शुक्ला म्हणाले की, मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढय़ा लोकहितकारी योजना लागू झाल्या. जेएनयूआरएम, मनरेगा, अन्न सुरक्षा, जमीन सुधार, लोकपाल अशी काही ठळक उदाहरणे देता येतील. या कामगिरीच्या भरोशावरच आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. रालोआ सरकारने काहीही न करता इंडिया शायनिंगचा आभास निर्माण केला. यूपीएने प्रत्यक्षात योजना लागू करून सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा फरक लक्षात घेण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या मुलाखतीवर जो काही वाद निर्माण होत आहे, त्यातही तथ्य नसल्याचे शुक्ला म्हणाले.
नाही. त्यांना जे काही सांगायचे होते, ते त्यांनी मुलाखतीत सांगितले. भविष्यातही ते मुलाखती देत राहतील, असे शुक्ला म्हणाले.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज चुकीचेच
निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज वारंवार चुकीचे ठरले आहेत. काँग्रेसच्या कामगिरीबाबत सध्या बांधले जाणारे अंदाज वस्तुस्थितीला धरून नाहीत. विधानसभांचे निकाल लोकसभेला लागू पडत नाहीत, हे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार ठरल्यानंतर नेमके काही भाकीत वर्तवता येईल, असे शुक्ला यांनी सांगितले. वेगळ्या विदर्भाची मागणी होत असली, तरी हा विषय काँग्रेसच्या कार्यक्रमपत्रिकेत नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही, असे शुक्ला यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.