आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ पशुपालकांवर होणार गुन्हे दाखल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकाक्षेत्रातील सर्वच बेकायदेशीर पशुपालकांना महापालिका पोलिस विभागाकडून नोटीस बजावली जाणार असून, मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिमेत अडसर ठरणाऱ्या पशुपालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पशुशल्य चिकित्सक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांत १६४ मोकाट जनावरांवर कारवाई करून तब्बल दीड लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यांवर सध्या मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मागील आठ दिवसांपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोकाट जनावरे पकडणाऱ्या पथकाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांचे संरक्षण असतानासुद्धा पथकावर हल्ला करण्यात आल्याने महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी या घटनेला गांभीर्याने घेतले आहे.
हल्ला झाल्यामुळे कारवाई थांबवली जाणार नसून, ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. या अंतर्गत रस्त्याप्रमाणे मुख्य मार्गावरदेखील मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात बसून राहत असल्याने वाहनचालकांना ते गैरसोयीचे ठरत आहे. कोणत्या क्षणी मोकाट जनावर वाहनाच्या आडवे येईल, याचा नेम नसतो. या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवर मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. पशुपालकांकडून मिळणा-या धमक्यांना भीक घालता थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून, आगामी काळात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र केली जाणार अाहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पशुपालकांमधील संघर्ष तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे.