आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raosaheb Danve In Nagpurraosaheb Danve In Nagpur

मंत्रिपदाची हवा डोक्यात गेलेल्यांची भाजपमध्ये गय करणार नाही : दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा मान-सन्मान न ठेवणार्‍यांची पक्ष गय करणार नाही,’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी नागपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात स्वपक्षीय नेत्यांना दिला.

‘मी कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम केल्यामुळेच पक्षाने मला आजवर अनेक पदांची संधी दिली. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातही प्रत्येक कार्यकर्त्यांचा मान राखला जाईल. त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी दर सोमवारी व मंगळवारी मुंबईत राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ दिला जाईल,’ असे आश्वासनही दानवेंनी मेळाव्यात दिले.
तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी फडणवीस सरकारची स्तुती केली. शंभर दिवसांत या सरकारने उत्तम काम केले. शेतकरी आत्महत्या दुर्दैवी असून या विषयाचे राजकारण करू नये. हा प्रश्न सुटण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा उपाय सुचवावेत, असा सल्ला त्यांनी दिला.

आठ दिवसांत मंत्रिपद सोडू
केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आमदारांनी गावे दत्तक घेण्याची योजना लागू होणार आहे. पक्षात ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायाने आपण या आठवड्यात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे दानवे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ओवेसी हेच माकड
भाजपला बंदर म्हणणारे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे स्वत:च माकड असल्याने त्यांच्याकडून दुसर्‍या कुठल्या भाषेची अपेक्षा करणार? या शब्दांत दानवे यांनी खासदार ओवेसींचा समाचार घेतला.

शिवसेना आमदार फोडणार नाही
भाजप - शिवसेनेची समन्वय समिती आठ दिवसांत नेमली जाईल. त्यात ६ जणांचा समावेश असेल. २१ आजी- माजी आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र शिवसेनेचे आमदार आम्ही फोडणार नाही, असे दानवेंनी स्पष्ट केले.