आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांचन खूनप्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - कांचन मेश्राम बलात्कार व खूनप्रकरणी दोन नराधमांना न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. अनरसिंग किसनसिंग ठाकूर (30) व राकेश मनोहर कांबळे (30) अशी आरोपींची नावे आहेत.
मोक्कांतर्गत शिक्षा भोगत असताना अनरसिंग हा 2005 मध्ये रुग्णालयातून पळून गेला होता. कळनेश्वर येथील कुक्कुटपालन केंद्रात कामावर असलेला त्याचा मित्र राकेशकडे तो वास्तव्याला गेला. या ठिकाणी त्यांचा परिचय पवन मेश्राम याच्याशी झाला. त्याच्या घरी येणे-जाणेही सुरू झाले. एक दिवस पवनची चुलत बहीण कांचन हिची राकेशने छेड काढली असता तिने चप्पल भिरकावली. याचा वचपा काढण्यासाठी 18 डिसेंबर 2005 रोजी पहाटे दोन्ही आरोपी कांचनच्या घरात शिरले. तिला फरपटत ओढून गावकुसाबाहेर नेले. दुसर्‍यादिवशी सकाळी विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह शेतात सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार व खूनाचा गुन्हा नोंदविला होता.