आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर चौघांकडून बलात्कार, शस्त्राचा धाकाने नागपुरात अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - एका सतरावर्षीय मुलीवर चार नराधमांनी शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात सोमवारी उघडकीस आली. पीडित मुलगी ही अकरावीमध्ये शिकते.
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ती एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये नोकरी करते.
रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास पीडित मुलगी सहकाऱ्यासोबत घरी परत येत असताना टीबी वॉर्डच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावर गणेश रामदास सातपुते, करुणानंद रमेश मून, रोहित संजय तांबे आणि अन्य एकाने त्यांना अडवले. आरोपींनी पीडित मुलीच्या मित्राला शस्त्राने जखमी करून पळवून लावले आणि मुलीला निर्जन स्थळी नेले. त्यानंतर नराधमांनी शस्त्राच्या धाकावर अत्याचार केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला अाहे मात्र अाराेपी फरारच अाहेत.

नागपुरात २४ तासांत तीन खून
नागपुरात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा खून करण्यात आला. वाहन चालक सय्यद सलीम अब्दुल खलिल पठाण हा रविवारी रात्री मशीदीजवळ उभा होता. त्यावेळी दाेघांनी जुना वाद उकरून काढत त्याच्यावर शस्त्राने वार केले. दुसऱ्या घटनेत, आकाश मंडल याने मित्र अशोक उंबरकर याला घराबाहेर बोलवून नेले आणि त्याचा खून केला तसेच त्याचा अपघाताने मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेह सेंट झेविअर शाळेसमोर फेकला. तर साेमवारी अज्ञात आरोपींनी पेंटींगचे काम करणारा संदीप चौधरी या युवकाचा घरात घुसून खून केला.
बातम्या आणखी आहेत...