आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात 21 लाख नागरिकांना मिळणार स्वस्त धान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - केंद्र सरकारने नव्यानेच पारित केलेल्या अन्नसुरक्षा विधेयकामुळे अमरावती जिल्ह्यातील 21 लाख नागरिकांना स्वस्त दरात धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात 29 लाख लोकसंख्या असून, त्यांपैकी 70 टक्के जनतेला कमी किमतीत धान्य उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. योजनेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय, पिवळे आणि केशरी शिधापत्रिका कार्डधारकांचा समावेश असणार आहे. मात्र, लाभार्थ्यांचे निकष ठरवण्याचा अंतिम अधिकार संबंधित राज्य सरकारला देण्यात आला आहे. याबाबत जिल्ह प्रशासनाकडे अद्याप कोणतेही निर्देश आलेले नसून, केंद्र सरकारच्या विधेयकातील तरतुदीनुसार ग्रामीण भागातील 75 टक्के तर शहरी भागातील 50 टक्के नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजना अस्त्विात आल्यानंतर बीपीएल, एपीएल, अंत्योदय, पांढरी, अन्नपूर्णा अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिका रद्द करून मोफत आणि स्वस्त दरातील अशा दोन प्रकारच्या शिधापत्रिका राहतील. याकरिता उपलब्ध माहितीनुसार, पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून मोफत आणि स्वस्त दरातील लाभार्थी ठरवण्यात येईल.

नव्या शिधापत्रिकांवर कुटुंबप्रमुख म्हणून गृहिणीचे नाव असेल. छायाचित्र असलेले बारकोड रेशनकार्ड लाभार्थींना दिले जाईल. पुढील वर्षभरात शिधापत्रिकांच्या प्रकारांची फेररचना करून नवे कार्ड वितरीत करण्यात येईल.

अद्याप सर्वेक्षणाचे आदेश नाहीत
राज्य आणि केंद्र सरकारच्या निकषात जे बसतील, त्यांनाच स्वस्त दरात धान्य मिळेल. अद्याप तरी आम्हाला लाभार्थी परिवारांच्या सर्वेक्षणाचे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. रवींद्र चांदूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी