नागपूर - राज्यातील अंगणवाडी सेविकांची २२५० व मिनी अंगणवाडी सेविकांची १२५७ अशी एकूण ३५०५ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचे आदेश देण्यात आले ओहत. ही भरती प्रक्रिया त्वरित होण्यासाठी मुलाखतीचे गुण वगळून गुणवत्तेच्या आधारावर करण्याच्याही सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत
दिली.
विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, भाई जगताप यांनी याविषयी प्रश्न विचारला होता. यावर मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त असल्याने एकात्मिक बालिवकास योजनेच्या कामावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार केला असून त्यासाठी आता तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. सध्या ३५०५ रिक्त पदे
भरण्यात येतील. खरे तर एकूण १३ हजार पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे आढळून आल्याने त्याचाही विचार होत आहे.