आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा चढला, चंद्रपूर ४५ - वर्धा ४४.५ - नागपूर ४४.३ अंश शतांश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आबालवृद्ध त्रासून गेलेे आहेत. या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागपुरातील सदर भागात बर्फगोळ्याचा आस्वाद घेताना तरुणी. - Divya Marathi
विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आबालवृद्ध त्रासून गेलेे आहेत. या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागपुरातील सदर भागात बर्फगोळ्याचा आस्वाद घेताना तरुणी.
नागपूर - विदर्भात आता ऊन तापायला सुरुवात झाली आहे. ऊन आणि गर्मीमुळे लोकांनी कामाशिवाय दुपारचे बाहेर पडणे कमी केले आहे. कूलर व पंखे चाेवीस तास सुरू राहातात. जनावरे दुपारी झाडाखाली सावली शोधून उभी असतात. तर चिमण्या पाखरांची पाण्यासाठी चिवचिव सुरू असते.

शुक्रवार, १ मे रोजी िवदर्भात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५ अंश शतांश तापमानाची नोंद करण्यात आली. िवदर्भात पारा चढायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर नंतर नागपूर ४४.३ अंश शतांश, वर्धा ४४.५ व ब्रम्हपुरी येथे ४३.७ अंश शतांश तापमानाची नोंद झाली. अकोला ४२.७, अमरावती ४२.८, यवतमाळ ४२.५ येथे ४१ अंश शतांश तापमान नोंदवण्यात आले. बुलडाणा येथे ४०.३ अंश शतांश तापमान होते.