आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस क्रांती: एकरी १० क्विंटल कापूस उत्पादनासाठी संशाेधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भारतीय कापसाच्या राजमुकुटातील ‘हिरा’ म्हणून सुविख्यात कापसाचे सुविन वाण येथेही घेता यावे म्हणून वर्धा रोडवरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत त्यावर संशोधन व प्रयोग सुरू अाहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आदी कापूस उत्पादक प्रदेशात हे वाण घेता यावे म्हणून हे प्रयोग सुरू आहे. या भागातील वातावरणात तग धरणारे आणि एकरी किमान १० क्विंटल उत्पन्न देणारे वाण विकसित करणा-यावर अामचा भर असल्याचे संस्थेचे संचालक केशव क्रांती यांनी सांगितले.

सुविन रत्ना या वाणाची लागवड दक्षिण भारतात केली जाते. एकरी ६ क्विंटल उत्पन्न येते. यासाठी ओलिताची वा ठिबक सिंचनाची आवश्यकता आहे. मात्र कोरडवाहूमध्येही घेता यावे म्हणून काही परीक्षणे करीत आहोत. सध्या १६ हेक्टरमध्ये प्रयोग सुरू असल्याचे क्रांती यांनी सांगितले. शेतक-यांनी सोयाबीन घेतल्यानंतर त्यांना सुविन वाण लावता यावे, असे प्रयत्न आहे. २०१२-१३ पासून प्रयोग सुरू असून त्याचे चांगले परिणाम दृष्टिपथात येत आहे. भारतीय सुजाता या वाणाशी इजिप्शियन वाणाचे क्राॅस ब्रिडिंग करून सुविन वाण १९६८ मध्ये िवकसित करण्यात आले. त्यानंतर चार वर्षे या वाणाची प्रत्यक्ष शेतीवर प्रात्यक्षिके सुरू होती. १९७२ मध्ये हे वाण प्रमाणित करण्यात आले आणि १९७४ मध्ये राजपत्रात शेक-यांना वापरण्यास योग्य असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आणि १९७९ मध्ये शेतक-यांना देण्यात आले. सुविनचे ३६ हजार गाठी हे सर्वाधिक उत्पादन १९८९-९० मध्ये झाले. एकेकाळी भरपूर उत्पन्न असलेल्या या वाणाची लागवड झपाट्याने कमी झाली. सध्या २.६५ लाख गाठी इतके उत्पन्न देशात होते. सुविनसारखे वाण जगात एकमेव आहे. गिझा-४५ व सुदान-व्हीएस या इजिप्शियन वाणाशीच याची तुलना होऊ शकते. याचा धागा ३७ ते ३९ मि. मी. इतका लांब असतो.

दीड हजार कोटींची बचत
काॅटन असोसिएशन आॅफ इंडिया सध्या सुविनच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. अमेरिका आणि इजिप्तमधून आपण सुमारे दीड हजार कोटींच्या लांब धाग्याचा कापूस आयात करतो. भारतात याचे लागवड क्षेत्र वाढल्यास भारताचे दीड हजार कोटी वाचतील. शिवाय येथील शेतकरीही सधन होतील. कारण सुिवन व्हरायटीला किमान दहा हजार रुपये क्विंटल भाव मिळतो.

मुंबईत उभारणार काॅटन म्युझियम
भारतीय कापसाच्या शोधापासून विकासापर्यंत संपूर्ण माहिती असणारे संग्रहालय मुंबईच्या काॅटन असोसिएशन आॅफ इंडियाच्या कार्यालयात सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती या संग्रहालयाची जबाबदारी असलेल्या नयना तडवळकर यांनी दिली. यामध्ये िवज्ञान-तंत्रज्ञान, संशोधने, इतिहास, मूल्य वर्धन, औद्योगिक िवकास, कापूस ते कापड, तसेच राजकीय इतिहास दाखवला जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...