आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळली; 27 मुले, 18 मुली मद्यधुंद अवस्थेत सापडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उपराजधानीच्या वर्धमाननगरातील लगून ब्लू या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकला. त्यात 27 मुले आणि 18 मुली मद्यधुंद अवस्थेत सापडल्या. हॉटेल मालकांनीच ही रेव्ह पार्टी आयोजित केली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेले सर्व 18 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी आहेत.


डीजे रमनजीत सैनी, डीजे तेजस यांच्या नावासह हॉटेलमालक राजेंद्रसिंह देवान यांनी ‘संडे हार्डरॉक आफ्टरनून’ नावाने पार्टी आयोजित केली होती. पार्टीचा संदेश मोबाइल आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून पाठवण्यात आला होता. पार्टीत एका कपल्ससाठी 700 आणि प्रती व्यक्ती 500 रुपये प्रवेशशुल्क ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी 2 वाजता पार्टीत प्रवेश देण्यात येणार होता, तर मुलींना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेशाची मुभा देण्यात आली होती. हॉटेल मालकाकडे डीजेचा परवाना नाही. शिवाय, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दारू सर्व्ह करण्यासंदर्भात हॉटेल मालकाने पूर्वपरवानगीही घेतली नव्हती. या पार्टीत चरस, गांजासारख्या अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संध्याकाळी 6 वाजता हॉटेलवर छापा टाकला. त्या वेळी तेथे एका हॉलमध्ये सर्व मुले आणि मुली मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. पोलिस आल्यावर एकच गोंधळ उडाला. तेव्हा अनेकांना काय चालले आहे, हेही समजत नव्हते.