आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या इंजिनिअर युवतीचा अपघाती मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपराजधानीतील अंबाझरी रोडवर भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हे चौघेही नागपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. मृतांमधील एक युवती ईशिता मोहन ही औरंगाबादची रहिवासी आहे.
अनुराग अनिल खापर्डे (22), ईशिता मालव मोहन (21, मूळ रा. औरंगाबाद), उज्‍जवल गुटा गुटिया (22, रा. मुंबई) आणि र्शेया जगदीशचंद्र जोशी (21, मूळ रा. रायगड, छत्तीसगड) हे चौघे बुधवारी रात्री होंडा सिटी कारने वाडी येथील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपल्यानंतर परतताना अनुरागचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने झाडाला धडक दिली. या अपघातात कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अनुराग आणि त्याची मैत्रीण ईशिता यांचा मृत्यू झाला, तर र्शेया आणि उज्‍जवल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुराग आणि उज्‍जवल हे दोघेही यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे, तर ईशिता आणि र्शेया सेंट व्हिंसेंट अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी आहेत.

(फोटो : नागपुरातील अमरावती रोडवर बुधवारी रात्री 1.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघे जण जखमी झाले. अपघातग्रस्त कार चेंदामेंदा झाली होती)