आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा- यवतमाळ रस्‍त्‍यावरील अपघातात पाच जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्‍यातील शिरपूर येथे आज (बुधवार) पहाटे अडीच वाजता इंडिका कार आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत कारमधील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमधील सर्वजण यवतमाळ जिल्ह्यातील खाटंजी गावचे रहिवासी आहेत.

प्रत्‍यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे वर्धा-यवतमाळ रस्त्यावर शिरपूर येथे ट्रक चालकाने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये सुमीत सुरेश कांबळे, अमोल प्रभात गोडे, आकाश ऊर्फ गोल्डी विजयराव गिरी, अजय गणपतराव कुंभरे, राहुल अशोक फुसे यांचा समावेश आहे. नवीन घेतलेल्या इंडिका कारमधील सीटला कव्हर बसविण्यासाठी हे सर्वजण नागपूरला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला.