आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Leader Ramdas Athawale Wants Shiv Sena And BJP Full Supports

भाजप-शिवसेनेनेच घ्यावी रिपाइंची जबाबदारी - रामदास आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -‘रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळण्यासाठी किमान 12 आमदार निवडून येणे आवश्यक आहे. भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांनी त्याची जबाबदारी घ्यावी,’ अशी अपेक्षा रिपाइंचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, विधानसभेसाठी आम्ही सुमारे 57 जागांची यादी दिली आहे. त्यातील किमान 20 तरी जागा मिळाल्या पाहिजेत. महायुतीचे आम्ही पहिले भागीदार असल्याने आम्हाला झुकते माप मिळायला पाहिजे. या 20 जागांपैकी 13 जागा विदर्भातील आहेत. यामध्ये उत्तर नागपूर, राजुरा, चिमूर, वर्धा, मोर्शी, अर्जुनी-मोरगाव, तिवसा, बडनेरा, उमरखेड, राळेगाव, बाळापूर, मेहकर व वाशीम या जागांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.