आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माेदी सरकारकडून अपेक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने जनतेला अनेक आश्वासने दिली. त्यामुळे केंद्रात भाजप सरकार आले. ३७० कलम हटवण्याचे आश्वासनही भाजपने दिले होते. त्यामुळे जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे ३७० कलम हटवण्यासोबत राममंदिर उभारण्यासह इतर आश्वासनांची पूर्तता करावी, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी स्पष्ट केली.
नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या अखिल भारतीय तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुण कुमार यांनी हे मत व्यक्त केले. ‘लोकसभा निवडणूक काळात भाजप अनेक आश्वासनांसह जनते पुढे गेले होते. त्या आश्वासनांच्या भरवशावर जनतेने भाजपला प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्यानेच भाजपला केंद्रात सरकार स्थापन करता आले. त्यामुळे भाजप सरकारने जनतेल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, ही संघाची अपेक्षा आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे राज्यघटनेचे ३७० कलम म्हणजे तत्कालीन परिस्थितीला धरून असलेली तात्पुरती सोय होती. परंतु हल्ली या कलमाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने हे कलम हटविण्यात यावे, अशी संघाची अपेक्षा अाहे. मात्र त्यासाठी सरकारला कालमर्यादा ठरवून देण्यात आलेली नाही’, असे अरुण कुमार म्हणाले.

भाजपने पक्षीय मतैक्य घडवून अाणावे
जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपीचे सरकार आहे. त्यामुळे तेथे दोन्ही पक्षांचा संयुक्त अजेंडा अाहे. कलम ३७० हटविण्यात अनेक अडचणी असून राजकीय पक्ष या विषयावर राजकारण करतात. परंतु राष्ट्रहितासाठी सर्व पक्षांमध्ये मतैक्य घडवून आणण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागेल. राजकीय पक्षांनीही हे कलम हटविण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, अशी मागणी संघाने केली. नेपाळमध्ये संघाचे काम चांगले असून तेथे आलेल्या भूकंपाच्या आपत्ती काळात संघाच्या १,६०० स्वयंसेवकांनी लोकांच्या पुनर्वसनासाठी उत्तम कार्य केल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...