आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Mohan Bhagwat\'s Vijay Dashmi Speech At Nagpur News In Divyamarathi

RSS प्रमुखांचे भाषण Doordarshan वर LIVE, सरकारी वाहिनीचा दुरूपयोग?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: विजयादशमीनिमित्त नागपुरात स्वयंसेवकांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत)

नवी दिल्‍ली/ नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त शुक्रवारी सकाळी स्वयंसेवकांना संबोधित केले. भागवत यांच्या भाषणाचे राष्ट्रीय वाहिनी 'दूरदर्शन'वर थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. आरएसएसने सरकारी वाहिनीचा दुरुपयोग केला आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

सरसंघचालक भागवत यांचे भाषण 'दूरदर्शन' पहिल्यांदा प्रसारित करण्‍यात आले. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यात मौलवी आणि फादर हेदेखील आपले भाषण थेट प्रसारित करण्याची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी दूरदर्शनवरून सरसंघचालक भागवत यांचे विजयादशमीचे संबोधन थेट प्रसारित कधीच करण्यात आले नव्हते. ठळक बातम्यांमध्ये ते दाखवले जात होते. परंतु केंद्रात भाजप प्रणित एनडीएचे सरकार आहे.
प्रसारणाला विरोध
मोहन भागवत यांचे भाषण दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित केल्याने रामचंद्र गुहा यांनी आक्षेप नोंदविला आहे. गुहा यांनी 'ट्वीट'मध्ये लिहिले आहे कीर आरएएएस ही सामाजिक हिंदू संघटना आहे. भविष्यात मशिदीतील इमाम, चर्चमधील फादर थेट प्रक्षेपण दाखवण्याची मागणी करू शकतात.

संघाची वाढली ताकद...
गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला ऐतिहासिक विजय मिळाला. त्यात संघाचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. केंद्रात भाजपची सत्ता आल्याने संघाची ताकद वाढली आहे.

दरम्यान, आज, विजयादशमीच्या पर्वावर सकाळी आरएसएसतर्फे शस्त्रपूजन करून पथसंचलन करण्यात आले. शेकडो स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने नागपूर शहरात पथसंचलनात सहभागी झाले. नंतर मोहन भागवत यांचे भाषण झाले.
विजयाचे कौतुक...
भागवत यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भारताच्या महत्त्वाकांक्षी 'मंगळयान' मो‍हिमेत सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच आशियाई स्पर्धेत सोने लुटणार्‍या अर्थात सूवर्णपदक पटकावणार्‍या क्रीडापटूंचे भागवत यांनी कौतुक केले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मोहन भागवत यांनी केले नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचा गौरव...

'दूरदर्शन'वर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण थेट प्रसारित करणे, योग्य आहे का?