आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांपर्यंत सत्तेच्या मोहापासून दूर राहण्याचे ट्रेनिंग देत आहे RSS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सत्तेच्या मोहापासून दूर राहण्याचे प्रशिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांना देत आहे. अशाच स्वरुपाचा एक प्रशिक्षण वर्ग गेल्या आठवड्यात वाराणसीत झाला. येत्या जुलै महिन्यात नागपूरमध्ये आणखी एक वर्ग आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील सरकार
केंद्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या भाजप नेतृत्वातील सरकार आहे. भाजपच्या सरकार स्थापनेसाठी जो प्रचार केला जातो त्यात स्वयंसेवक उत्साहाने सहभागी होतात. आता त्या त्या राज्यांमध्ये सरकार आले असल्याने त्यातही सहभागी होण्याचा काही स्वयंसेवक प्रयत्न करीत आहेत. त्याचा फटका संघाला आणि भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वेळीच आवश्यक पावले उचलून याला प्रतिबंध घालण्याची योजना आखण्यात आली आहे.
स्वयंसेवकांना सत्तेच्या मोहापासून दूर ठेवणे हा गेल्या आठवड्यात वाराणसीत झालेल्या प्रशिक्षण शिबिराचा एकमेव उद्देश होता. यावेळी सरसंघचालक मोहन भागवन यांनी स्वतः स्वयंसेवकांना मार्गदर्शन करुन सत्तेपासून दूर राहण्यास सांगितले होते.
भाजपच्या नेत्यांना नो एन्ट्री
सरसंघचालक मोहन भागवत वाराणसीत असल्याची माहिती मिळाल्यावर केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी भेटण्याची वेळ मागितली होती. पण भागवत यांनी त्यांना वेळ दिली नाही. मार्गदर्शन शिबिर केवळ स्वयंसेवकांवर फोकस राहावे हा संघाचा उद्देश आहे. यात कोणतीही तडतोड केली जात नाही. संघाचा सामान्य प्रशिक्षण कार्यक्रम ‘संघ शिक्षा वर्ग’ यापासून हे प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आले आहे.