आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruler Part Not Load Sheding Free, Power Minister Cleared

भारनियमनातून ग्रामीण भागाची सुटका नाहीच,ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यात विजेचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागात असलेल्या भारनियमनाच्या वेळांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्यातील ९१ टक्के भाग भारनियमनमुक्त करण्यात आला असून कृषिपंपांना सध्या तरी २४ तास वीजपुरवठा करता येणे शक्य नाही. त्यासाठी आणखी दोन हजार मेगावॅट विजेची गरज असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या ग्रामीण भागात १२ ते १४ तास असलेल्या भारनियमनासंदर्भात विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, राजेंद्र पाटणी, समीर मेघे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. ऊर्जामंत्री म्हणाले की, नादुरुस्त रोहित्रे बदलण्याकरिता यापूर्वी असलेली ८० टक्के वीज देयके भरण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. वीज कंपनीकडे रोहित्रे उपलब्ध असल्यास नादुरुस्त रोहित्रे तीन दिवसांत बदलण्यात येणार आहेत आणि उपलब्ध नसल्यास आठ दिवसांचा कालावधी लागेल, असेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आलेख
विजेची गरज- १४५०० ते १६५०० मे.वॅ.
विजेची उपलब्धता १४३०० ते १६००० मे.वॅ.

नादुरुस्त रोहित्र
राज्यात कृषिपंपांकरिता कार्यरत एकूण रोहित्रे- २,३८,०७०
राज्यात नादुरुस्त रोहित्रांची संख्या - ३७,७००