आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • S T Bus Torched In Amratwati : One Died , 17 Injured

अमरावतीतील तिवसात माथे‍फ‍िरून पेटवली एस टी बस : एकाचा मृत्यू , तर 17 जण होरपळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - तिवसात माथेफ‍िरूने पे्ट्रोल टाकून एसटी बस पेटवली. या आगीत एकाचा मत्यू, तर 17 जण होरपळे आहेत. बसचा आगीने कोळसा झाला.


मदतकार्यासाठी शेंदूरजना बाजार येथील ग्रामस्‍थांनी धाव घेऊन 17 जणांना बाहेर काढले, मात्र एकाला बाहेर काढणे शक्य न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. एस .टी. बस तिवसावरून चांदूररेल्वेकडे निघाली. त्यात एकूण 40 पर्यंत प्रवाशी होते. मागच्या बाकावर बसलेल्या युवकाने पेट्रोल टाकून बस पेटवली. प्रवाशांनी आरडाओरड करताच बस थांबवण्‍यात आली व त्यांना तातडीने बाहेर काढण्‍यात आले . परंतु , आगीत 17 जण होरपळी, तर त्यात एकाचा मृत्यू झाला. जखमींना अमरावती जिल्हा रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.