आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईभक्त-शंकराचार्यांच्या अनुयायांमध्ये जुंपली !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - साईबाबांसंदर्भात शंकराचार्यांनी केलेल्या वक्तव्यावरून साईभक्त आणि शंकराचार्यांच्या अनुयायांमध्ये जुंपली आहे. शंकराचार्यांविरुद्ध शिर्डी आणि नागपुरात दाखल गुन्ह्यांविरोधात त्यांच्या अनुयायांनी प्रथम र्शेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे.
याचिकाकर्ते गोविंद बाळकृष्ण कुकटे यांचे वकील अँड. सतीश उके यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर खंडपीठाने 50/2014 क्रमांकाच्या पुनर्विचार याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार, वेगवेगळे संप्रदाय म्हणजे धर्म नव्हे. त्यामुळे एखाद्या संप्रदायासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भादंविच्या 295 (अ) अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा होत नाही. शिवाय धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांना राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. शंकराचार्यांविरुद्ध शिर्डी आणि नागपूर पोलिसांनी अशी परवानगी घेतली नाही.
शंकराचार्य सर्वोच्च धर्मगुरू आहेत. त्यांची शिकवण हिंदू धर्मीयांपुरती र्मयादित आहे. शंकराचार्यांच्या शिकवणीचा संबंध केवळ हिंदू धर्मींयापुरता र्मयादित आहे. त्यांच्या शिकवणीत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने पंकज महाजन आणि सहकार्‍यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दिली. या स्वरूपाची एक तक्रार शिर्डी येथेही केली. शंकराचार्यांची शिकवण हिंदूंपर्यंत पोहोचू नये, यासाठी जाणीवपूर्वक अशा तक्रारी करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

या तक्रारींच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यामुळे शंकराचार्य आणि हिंदू धर्माची बदनामी झाली, असे अर्जात नमूद आहे. त्यामुळे शंकराचार्यांविरुद्ध तक्रार करणार्‍यांविरुद्ध भादंविच्या 296, 298, 500, 34 कलमान्वये गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी अर्जदाराने केली आहे. न्यायदंडाधिकारी ए. आर. राजा यांनी वरील अर्ज सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे, असे अँड. उके यांनी सांगितले.