आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या बैठकीत राजकीय विषय अजेंड्यापासून दूर; राजनाथ सिंह अमरावतीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आठ दिवस चालणा-या अमरावती येथील बैठकीत कोणत्याही प्रकारचा राजकीय विषय अजेंड्यावर नसल्याचे संघाचे पदाधिकारी वारंवार सांगत आहेत. मात्र दुसरीकडे बुधवारी भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हे प्रांत प्रचारकांशी संवाद साधणार असून तो पूर्णपणे राजकीय स्वरूपाच व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनितीचाच असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात सलग दोन दिवस लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथसिंग यांची सरसंघचालकांची बैठक झाल्यानंतर राजनाथ सिंहे हे प्रांत प्रचारकांकडून भाजप विषयीचे मत- मतांतरे ऐकून घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.


राजनाथ सिंग यांची अध्यक्षपदी तर नरेंद मोदींची प्रचारप्रमुखपदी निवड, लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी, नितीशकुमार यांची रालोआला सोडचिठ्ठी, गेल्या काही वर्षातील भाजपची देशपातळीवरील कामगिरी तसेच पंतप्रधान पदासाठी पक्षाने कोणाचे नाव जाहीर करावे, या प्रमुख मुद्द्यावर बुधवारच्या बैठकीत मंथन होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राजनाथ सिंग हे संपूर्ण दिवस अमरावतीत मुक्कामी आहेत. त्यांच्या या दौ-यात लोकसभा निवडणुकीबाबत भाजप आणि संघाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत मोदी यांच्या नावावर पंतप्रधानपदासाठी शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे. देशभरातील 180 प्रांत प्रचारक अमरावतीत दाखल झाले आहेत. 12 व 13 जुलै रोजी संघाची मुख्य बैठक होणार आहे.

या बैठकीत सर्व प्रांत प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य व संघाशी संबंधित सर्व संघटनांचे प्रमुख उपस्थित राहतील.

संघ कार्याचाही आढावा
मंगळवारपासून सुरू झालेल्या बैठकीत संघाशी संबंधित संघटनांचे प्रमुख आणि पदाधिकारी यांच्या बैठक सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये प्रामुख्याने संघाच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन, समीक्षा, विस्तार आणि योजना या विषयांवर चर्चा होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी, दत्ताजी होसबळे, सुरेश सोनी, सुनील देशपांडे हे पदाधिकारी 15 जुलैपर्यंत शहरात आहेत. विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया व अशोक सिंघल हेही शहरात दाखल झाले आहेत.