आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangh Keep Mum On BJP Defeat, Congratulating Aap

भाजपच्या पराभवावर संघाचे मौन, ‘आप’चे अभिनंदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या पराभवावर कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला.

संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी विजयाबद्दल आपचे अभिनंदन केले. दिल्लीत आपला मोठा जनाधार लाभला आहे. त्यामुळे आता दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांची आपने पूर्ती करावी, असे वैद्य म्हणाले. भाजपच्या दारुण पराभवाबद्दल संघाला नेमके काय वाटते, या प्रश्नावर त्यांनी कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला. त्याचा भाजपलाच विचार करायचा आहे. ते त्यांचे क्षेत्र आहे, असेही ते म्हणाले.

पुढे वाचा... संघाला बसला धक्का..