आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीता आव्हाळे होणार स्वच्छता दूत, 10 नोव्हेंबरला होणार घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - मंगळसूत्र विकून शौचालय बांधणा-या सायखेडा येथील संगीता आव्हाळे ही महिला वाशीम जिल्ह्यातील संपूर्ण स्वच्छता अभियानाची 'ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' होणार आहे. १० नोव्हेंबरला त्याची घोषणा होईल.
'दिव्य मराठी'ने ३ नोव्हेंबरच्या अंकात शौचालयासाठी संगीताने मंगळसूत्र विकल्याची बातमी प्रकाशित केली होती. सरकारकडून शौचालयासाठी ४,६०० रुपये अनुदान दिले जाते. संगीता यांच्या निर्णयानंतर शासनाने त्यात वाढ केली असून, आता १२,००० रुपये अनुदान मिळेल.