आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर शहरात स्कूल बस चालकांचा संप; पालकांची कसरत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शहरात स्कूलबस आणि व्हॅन चालकांच्या संप आज दुसर्‍या दिवशीही सुरुच आहे. त्यामुळे मात्र विद्यार्थ्यांचा पालकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांना आपल्या पाल्याला शाळेत ने-आन करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

आरटीओच्या कारवाई विरोधात स्कूलबस आणि व्हॅन चालकांनी संप पुकारला आहे. सुमारे साडे चारशे स्कूलबस आणि स्कूल व्हॅन चालक या संपात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन विभागाने 27 अटींची पूर्तता न करणार्‍या स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई केली होती. या कारवाईला विरोध करण्‍यासाठी स्कुल बस चालकांनी संप पुकारला आहे.

परिवहन विभाग वारंवार नियम बदलत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे स्कूलबस चालकांचे म्हणणे आहे.