आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या ऑटोरिक्षाला स्कॉर्पिओची धडक; एक ठार, तर 11 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या ऑटोरिक्षाला स्कॉर्पिओने दिलेल्या जोरदार धडकेत एक विद्यार्थिनी ठार, तर 11 जण जखमी झाले. नऊ जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शेगाव-खामगाव मार्गावरील जगदंबानगर चौकात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता झाला. अपघातानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. जमावाने काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. तसेच स्कॉर्पिओची तोडफोड केली.


चालक दादाराव बारब्दे नेहमीप्रमाणे गौलखेड व खेर्डा (गोसावी) येथील विद्यार्थ्यांना घेऊन नेहमीप्रमाणे ऑटोने शाळेकडे जात होते. रिक्षा शेगाव- खामगाव मार्गावरील जगदंबानगर चौकात पोहोचली. चालकाने रिक्षा शाळेच्या दिशेने वळवली. रस्ता ओलांडत असतानाच शेगावहून भरधाव येणा-या स्कॉर्पिओने रिक्षाला धडक दिली. यात ऑटोचालक दादाराव बारब्दे (रा. गौलखेड) याच्यासह 12 विद्यार्थी जखमी झाले. यापैकी 9 जखमींना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले. प्रेरणा ज्ञानेश्वर दळी (वय 5) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.